Kangana Ranaut: राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री   कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज  36वा वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. शालेय शिक्षण कंगनाने तिथेच घेतले. कंगनाच्या वडिलांची इच्छा होती की, तिनं डॉक्टर व्हावं. पण कंगना 12 वीमध्ये फेल झाली. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला. 


16 व्या वर्षी घर सोडून कंगना दिल्ली येथे गेली. दिल्लीमध्ये कंगनानं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तिला अनेकवेळा लोणचं आणि पोळी खाऊन दिवस काढावे लागले. कारण तिला कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळत नव्हती. महेश भट्ट यांनी कंगनाला बॉलिवूडमध्ये पहिली संधी दिली. इमरान हाश्मी आणि शायनी आहुजासोबत गँगस्टर चित्रपटात काम करण्याची संधी कंगनाला मिळाली. त्यानंतर कंगनाच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. फॅशन, तनु वेड्स मनु, क्विन तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. कंगनाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात.  कंगनाला तिच्या कला क्षेत्रातील कार्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार  आणि पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे. 


कंगनाची संपत्ती 


एकेकाळी आर्थिक अडचणींचा समाना करणारी कंगना आज कोट्यवधींची मालकीण आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, कंगना 96 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. वर्षभरात कंगना ही 15 कोटींची कमाई करते. चित्रपटांबरोबरच कंगना जाहिरातींमध्ये देखील काम करते. 






वक्तव्यांमुळे कंगना असते चर्चेत


कंगना ही तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना ही विविध विषयांवरील तिची मतं व्यक्त करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक वेळा कंगानाला तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेटकरी ट्रोल देखील करतात.  


कंगनाचे आगामी चित्रपट 


कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Kangana Ranuat: कंगना साकारणार 'चंद्रमुखी'; रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिली माहिती