मुंबई: तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असते. अलीकडेच तापसीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तापसीच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.


नुकत्याच झालेल्या 'लॅक्मे फॅशन वीक' (LFW) मध्ये, तापसी पन्नूने बोल्ड नेकलाइनसह हॉट रेड ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला. या ड्रेससोबत तिने हेवी डिझायनर नेकपीस घातला होता, ज्यावर लक्ष्मीची मूर्ती होती. हा फोटो शेअर करताना तापसीने लिहिले आहे की, 'हा लाल रंग मला कधी सोडेल? मात्र या फोटोमुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं दिसून येतंय.


तापसी पन्नूने या बोल्ड ड्रेसवर लक्ष्मीचा हार घालणे लोकांना आवडले नाही आणि त्यांनी तापसीला ट्रोल केलं. 


हा हिंदू धर्माचा 'अपमान' आहे अशा कमेंट्स त्यावर आल्या. तर बोल्ड लूकवर लक्ष्मीचा फोटो वापरणे म्हणजे देवीचा अपमान आहे असं काहींनी म्हटलंय. अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स तापसीच्या या लूकवर आल्या आहेत. 


तापसीने यापूर्वीही बोल्ड फोटो शेअर केले आहेत


याआधीही तापसी पन्नूने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूने ब्लू कलरच्या साडीमध्ये फोटोशूट केले होते. ही छायाचित्रे शेअर करताना तापसीने लिहिले होते, 'पंडित जी म्हणतात, ना चलन से ना चाल से, प्यार करणे वालोंको परखो उनके दिल से.'  


तापसीच्या या फोटोंवरही नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या. अजूनही ते फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. 


तापसी पन्नूचा 'फिर आयी हसीन दिलरुबा'


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तापसी पन्नू लवकरच 'वो लड़की है कहाँ' या चित्रपटात प्रतीक गांधीसोबत काम करताना दिसणार आहे. तसेच 2024 मध्ये तिचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती राजकुमार हिरानी यांच्या 'डँकी' या चित्रपटातही काम करत आहे. यात तिच्यासोबत शाहरुख खान काम करत आहे.


2021 मध्ये तापसीचा 'हसीन दिलरुबा 'हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


ही बातमी वाचा :