Bholaa Shankar Chiranjeevi Released Date : 'गॉडफादर' आणि 'वाल्टेयर वीरय्या' सारख्या सुपरहिट सिनेमानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भोला शंकर' (Bholaa Shankar) असे या सिनेमाचे नाव असून आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 


'भोला शंकर' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Bholaa Shankar Released Date)


'भोला शंकर' या मनोरंजनात्मक सिनेमात चिरंजीवीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होईल असे म्हटले जात आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाच्या कमाईवर चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास 'भोला शंकर' सज्ज आहे. 






तामिळ सिनेमाचा रिमेक 'भोला शंकर' 


'भोला शंकर' या सिनेमात चिरंजीवीसह कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) आणि तमन्ना भाटियादेखील (Tamannaah Bhatia) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाती कीर्ती सुरेश चिरंजीवीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'भोला शंकर' हा सिनेमा 'वेदलम' या तामिळ सिनेमाचा अधिकृत तेलुगू रिमेक आहे. 'वेदमल' या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अजीत कुमार, लक्ष्मी मेनन आणि श्रृती हासन महत्त्वाच्या भूमिकेत होते. 


'भोला शंकर' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चांगल्या सिनेमांचे रिमेक होणं ही आनंदाची बाब आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे हिंदी रिमेक झाले आहेत. आता प्रेक्षकांना 'भोला शंकर'ची उत्सुकता आहे. 


चिरंजीवीचा डॅशिंग लुक 


'भोला शंकर' या सिनेमाची घोषणा ऑगस्ट 2021 मध्ये करण्यात आली होती. हैदराबादमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. प्रेक्षकांना या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात चिरंजीवीचा डॅशिंग लुक पाहायला मिळणार आहे. आता चिरंजीवीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मेहर रमेशने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


संबंधित बातम्या


Bholaa Shankar First look : महाशिवरात्रीला प्रेक्षकांच्या भेटीला आला 'भोला शंकर'मधील चिरंजीवीचा लूक