Kamal Haasan recovers From COVID-19 : सुपरस्टार कलम हासनला कोरोनाची लागण झाली होती. पण आता ते कोरोनामुक्त झाले आहेत.
Kamal Haasan Recovers From COVID-19 : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण आता पूर्णपणे ते कोरोनामुक्त झाले आहेत. कमल हासन उपचार घेत असलेल्या रुग्णालयाने हासन यांच्या
आरोग्याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
श्री रामचंद्र मेडिकल सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. सुहास प्रभाकर म्हणाले,"कमल हासन यांना 22 नोव्हेंबर 2021 रोजी कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौम्य लक्षणे जाणवली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आता ते कोरोनामुक्त झाले आहेत". कमल हासन कोरोनामुक्त झाले असले तरी त्यांना आणखी काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार असल्याची, डॉक्टरांनी माहिती दिली आहे. निवेदनात म्हटले आहे, 3 डिसेंबर 2021 पर्यंत कमल हासन यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. 4 डिसेंबर 2021 पासून ते त्यांची नियमित कामे पुन्हा सुरू करू शकतात.
कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. अमेरिकेवरून परतत असताना त्यांना सौम्य खोकल्याचा त्रास जाणवला. त्यानंतर तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती त्यांनी ट्वीट करत दिली होती. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नसून नागरिकांनी अधिक काळजी घ्यायला हवी,असेही ते पुढे म्हणाले.
कमल हासन यांनी दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिवूडमध्येदेखील आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांनी 1960 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. कमल हासन एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्यांनी राजकारणातदेखील पाऊल ठेवले आहे.
संबंधित बातम्या
kamal haasan Covid Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण
तमिळनाडूमध्ये कमल हासन यांचा पराभव, कोयंबतूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयी
Money Heist Season 5 : मनी हाईस्टचा शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चोरी यशस्वी होणार का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha