Top Bold Movies on OTT : ओटीटीवर (OTT) दर आठवड्यात विविध धाटणीचे, दर्जाचे, जॉनरचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. या चित्रपटांची आणि वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता असते. प्रत्येक कलाकाराला चित्रपटात आणि वेबसीरिजमध्ये धुमाकूळ घालायचा असतो. ओटीटीवर सेन्सॉरशीप नसल्याने काही गोष्टी दाखवताना मर्यादा येत नाही. ओटीटीवरील अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये इंटिमेट सीन्सचा (Intimate Scenes) भडिमार करण्यात आला आहे. हे वेबसीरिज आणि चित्रपट एकट्यानेच पाहा. घरच्यांसोबत पाहण्याचा चुकूनही विचार करू नका. 


फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे (Fifty Shades of Grey) : 'फिल्टी शेड्स ऑफ ग्रे'मध्ये अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री डकोटा जॉक्सन आणि अभिनेत्री जेमी डोरनॅन मुख्य भूमिकेत आहेत. दोघांसाठी ही गेम चेंजर कलाकृती होती. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हे पाहता येईल.


'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) :  'लस्ट स्टोरीज 2' ही हिंदी वेबसीरिज आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अभिनीत ही सीरिज मागील वर्षात रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये तमन्ना आणि विजयचे अनेक इंटीमेट सीन दाखवण्यात आले होते. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


डार्क डिझायर (Dark Desire) : 'डार्क डिझायर' हा हॉलिवूड चित्रपट आहे. शाळेतील शिक्षकाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रेक्षक कल्पनाही करू शकत नाही अशी ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.


पांच (Paanch) : अनुराग कश्यपचा 'पांच' चित्रपट इंटीमेट कंटेटमुळे सिनेमागृहात रिलीज झाला नव्हता. त्यामुळे ओटीटीवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटात केके मेनन, विजय मौर्या, जॉय फर्नाडिस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


गारबेज (Garbage) : कौशिक मुखर्जी दिग्दर्शित 'गारबेज'मध्ये एका मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मुलाचा पर्सनल मोमेंटचा व्हिडीओ लीक होतो त्यानंतर पुढे काय घडतं हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येईल. या चित्रपटातही भरभरून इंटिमेट सीन्स आहेत. 


365 डेज (365 Days) : '365 डेज' हा हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात इंटिमेट सीन्सचा भडिमार करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.


फॅटल अट्रॅक्शन (Fatal Attraction) :  'फॅटल अट्रॅक्शन' हा 80 च्या दशकात रिलीज झालेला सर्वाधिक इंटिमेट असणारा चित्रपट आहे. या चित्रपटातील रोमँटिक अंदाजाने त्याकाळी सर्वांनाच वेड लावलं होतं. ऑस्करसाठी या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. 


संबंधित बातम्या


Deepika Padukone Ranveer Singh : दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने हटवले लग्नाचे फोटो; चाहत्यांना मोठा धक्का