Deepika Padukone Ranveer Singh Deletes Wedding Pictures : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या चर्चेत आहेत. दीपिकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाचे बेबी बंप पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच आता दीपिका आणि रणवीरमध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्याच्या एका कृतीने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन हटवले आहेत. 


रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे फोटो


रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. रणवीर-दीपिका यांचं बिनसलं असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. दीपवीरने वेळोवेळी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पण आता रणवीरने दीपिकासोबतचे लग्नाचे सर्व फोटो डिलीट केल्याने चाहते नाराज झाले आहेत. अभिनेत्याच्या इंस्टा प्रोफाइलवर त्याचा लग्नाचा एकही फोटो दिसून येत नाही. अभिनेत्याने लग्नाचे फोटो डिलीट केलेत की हाइड हे अद्यार समोर आलेलं नाही. 






इटलीत पार पडलेला लग्नसोहळा (Deepika Padukone Ranveer Singh Wedding)


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 'राम लीला' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या डेटिंगला सुरुवात झाली. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आणि त्यांचं प्रेम जगजाहीर झालं. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये ते लग्नबंधनात अडकले. दीपिका आणि रणवीरच्या इटलीतील लग्नसोहळ्याची चर्चा त्याकाळी चांगलीच रंगली होती. 


रणवीर-दीपिका वेकेशनवर (Ranveer Singh Deepika Padukone Photo Viral)


रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण वेकेशनवर गेल्याचं वृत्त आजच समोर आलं होतं. वेकेशनवर जातानाचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर-दीपिका एक जिना उतरताना दिसून येत आहेत. रणवीर-दीपिका 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. आता लग्नाच्या पाच वर्षांनी दीपवीरने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.


संबंधित बातम्या


Deepika Padukone : प्रेग्नंट दीपिका अन् रणवीर सिंह वेकेशनवर; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री