Top 10 OTT Release This Week : ओटीटीवर (OTT) या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. नेटफ्लिक्स (Netflix), जिओ सिनेमा (Jio Cimema), सोनी लिव्ह (Sony Liv) आणि हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना चांगलच मनोरंजन मिळत आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जाणून घ्या या आठवड्यातील 'टॉप 10' (TOP 10) चित्रपट (Movies) आणि वेबसीरिजबद्दल (Web Series). 


1.) द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4 : 'द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4' सध्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. या सीरिजने प्रेक्षकांचं  चांगलच मनोरंजन केलं आहे. 'द लीजेंड ऑफ हनुमान 4'ला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. 5 जून 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज झाली आहे.


2.) बडे मियां छोटे मियां : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. 6 जून 2024 रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.


3.) मैदान : अजय देवगनच्या 'मैदान'ने प्रेक्षकांना सिनेमागृहात खूप निराश केलं आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल. प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट 6 जून 2024 रोजी रिलीज झाला आहे.


4.) ब्लॅकआऊट : विक्रांत मेस्सी, सुनील ग्रोवर आणि मौनी रॉयचा 'ब्लॅकआऊट' हा चित्रपट आहे. 7 जून 2024 रोजी जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


5.) हिट मॅन : 7 जून 2024 रोजी 'हिट मॅन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ग्लेन पॉवेल आणि एड्रिया अर्जोना यांचा हा विनोदी चित्रपट आहे. 7 जून 2024 रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता. 


6.) बिकमिंग कार्ल लेगरफेल्ड : बिकमिंग कार्ल लेगरफेल्ड हा कार्ल लेगरफेल्डवर आधारित आहे. 7 जून 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


7.) वर्षंगलक्कू शेषम : बिकमिंग कार्ल लेगरफेल्डसह डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटीवर 7 जून 2024 रोजी वर्षंगलक्कू शेषमवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. मल्याळम भाषेतील हा पीरियड कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. प्रणव मोहनलाल, ध्यान श्रीनिवासन आणि निविन पॉली या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


8.) गुल्लक 4 : 'गुल्लक' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या सीरिजच्या चौथा सीझननेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 7 जून 2024 रोजी सोनी लिव्हवर ही सीरिज रिलीज झाली आहे.


9.) परफेक्ट मॅच सीझन 2 : 'परफेक्ट मॅच सीझन 2' हा एक रिअॅलिटी शो आहे. पहिल्या सीझननंतर आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'परफेक्ट मॅच सीझन 2' 7 जून 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.


10.) Hierarchy : Hierarchy ही दक्षिण कोरिअन सीरिज आहे. या सीरिजमध्ये रोह जियोंग ईई, ली चाए मिन, किम जे-वोन, जी ह्ये वोन आणि ली वोन-जंग महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 7 जून 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


संबंधित बातम्या