Adah Sharma on Endometriosis Diagnosis : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) स्वत:बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. खुलासा करत तिने चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलं आहे. 'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्रीने सांगितलं आहे की,"बस्तर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिची 48 दिवस मासिक पाळी सुरू होती. सलग एवढे दिवस रक्तस्त्राव सुरू होता. चित्रपटातील भूमिकेसाठी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणं तिला चांगलच महागात पडलं होतं. 
एंडोमेट्रिओसिस नामक गंभीर आजार तिला झाला होता. 


अदा शर्मा सध्या चित्रपटाच्या आणि सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपासून ती चित्रपट आणि सीरिजबद्दल भाष्य करत आहे. अजूनही तिच्याकडे अनेक चित्रपट आणि सीरिज पाईपलाईनमध्ये आहेत. या प्रोजेक्टसाठी अदा शर्मा खूप मेहनत घेत आहे. अदा शर्मा काही दिवसांपूर्वी 'बस्तर:द नक्सल स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत होती. मार्चमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. अभिनेत्रीने आता एका मुलाखतीत आपल्या प्रकृतीबद्दल भाष्य केलं आहे. अदा शर्मा म्हणाली की, सलग 48 दिवस रक्तस्त्राव सुरू होता".


एंडोमेट्रिओसिस नामक गंभीर आजाराची लागण


हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अदा शर्मा म्हणाली,"चित्रपटातील भूमिकांसाठी मला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची गरज होती. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात मला बारीक आणि कॉलेज मुलीप्रमाणे दिसायचं होतं. कमोंडोसाठी मी बलवान असणं गरजेचं होतं. बस्तरसाठी माझं भारदस्त व्यक्तीमत्त्व असणं गरजेचं होतं".


'बस्तर' या चित्रपटातील शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर करत अभिनेत्री पुढे म्हणाली,"मी एकादिवशी सलग 10 ते 12 केळी खाल्ली आहे. माझं वजन वाढावं असं निर्मात्यांना वाटत होतं. या चित्रपटात भरपूर अॅक्शन होती. या चित्रपटासाठी मजबूत असणं गरजेचं होतं कारण शूटिंगदरम्यान आठ किलोच्या खऱ्या बंदुकांचा वापर करावा लागत असे".


सलग 48 दिवस रक्तस्त्राव होत राहिला : अदा शर्मा 


अदा शर्मा पुढे म्हणाली,"खऱ्या आयुष्यात वेट ट्रेनिंग करताना तुम्ही खूप सावधान असता. तुम्ही विचार करुन श्वास घेता. शूटिंगदरम्यान मला पाठिचं दुखणं सुरू झालं. तसेच एंडोमेट्रिओसिस नामक गंभीर आजाराचीदेखील लागण झाली. एंडोमेट्रिओसिस या आजारात मासिक पाळी थांबत नाही. मला सलग 48 दिवस रक्तस्त्राव होत राहिला" 


बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अदा शर्माचा समावेश होतो. अदा शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अदा शर्माच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Adah Sharma : सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाली अदा शर्मा, म्हणाली, 'ही जागा मला सकारात्मक...'