Top 10 Marathi Movies : भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांची 30 एप्रिलला जयंती आहे. राजा हरिश्चंद्र या मराठी आणि भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यानंतर एका पेक्षा एक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. जाणून घ्या इतिहास रचणाऱ्या 'टॉप 10' (Top 10) सिनेमांबद्दल जाणून घ्या...


1. पिंजरा (Pinjara) : वी. शांताराम दिग्दर्शित 'पिंजरा' हा सिनेमा 1972 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'पिंजरा' हा भारतीय सिनेसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा ठरला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 वर्ष पूर्ण झाले असले तरी आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 


2. अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi) : 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा खूपच गाजला. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अश्विनी भावे, सुधीर जोशी अशी तगडी स्टारकास्ट होती. या विनोदी सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं. 'हृययी वसंत फुलताना', 'कुणीतरी येणार येणार गं' ही सिनेमातील गाणी चांगलीच गाजली. 


3. माहेरची साडी (Maherchi Sadi) : 'माहेरची साडी' हा ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा आहे. विजय कोंडकेंच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 12 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी सिनेमा ठरला होता. या सिनेमात अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विक्रम गोखले, किशोरी शहाणे मुख्य भूमिकेत होते. मराठी सिनेसृष्टीतील अजरामर सिनेमांत या सिनेमाची गणना होते. 


4. चिमणी पाखरं (Chimani Pakhar) : 'चिमणी पाखरं' हा सिनेमा 2001 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. महेश कोठारे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात सचिन खेडेकर आणि पद्मिनी कोल्हापुरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील 'चिमणी पाखरं' हे गाणं चांगलच गाजलं. 


5. गाढवाचं लग्न (Gadhvache Lagna) : 'गाढवाचं लग्न' हा सिनेमा सुपरहिट झाला होता. 2006 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रची अप्सरा सोनाली कुलकर्णीने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 


6. दे धक्का (De Dhakka) : 'दे धक्का' या विनोदी सिनेमात मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम आणि सिद्धार्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


7. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (Me Shivajiraje Bhosale Boltoy) : मराठी माणसाची मुंबईत आणि महाराष्ट्रात होणारी घालमेल 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. संतोष मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत होते. 


8. सैराट (Sairat) : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमामुळे मराठी सिनेप्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळाली. या सिनेमात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा खूपच गाजला. प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा सिनेमांगृहात जाऊन हा सिनेमा पाहिला. 


9. नटसम्राट (Natsamrat) : नाना पाटेकरांचा 'नटसम्राट' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील डायलॉगने प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. महेश मांजरेकरांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. 


10. पावनखिंड (Pawankhind) : कोरोनानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम 'पावनखिंड' या सिनेमाने केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 60 कोटींचा गल्ला जमवला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात अजय पुरकर मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 


संबंधित बातम्या


Dadasaheb Phalke: चित्रपट निर्मितीसाठी कर्ज घेतलं, पत्नीचे दागिनेही विकले; असे झाले दादासाहेब फाळके 'भारतीय चित्रपसृष्टीचे जनक'