Jiah Khan Suicide Case : अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) मृत्यूप्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर करणार आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला (Sooraj Pancholi) दिलासा मिळणार की त्याच्या अडचणीत वाढ होईल हे आज कळेल.
3 जून 2013 रोजी जियाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र जियाची आई रबिया यांनी वेगळाच आरोप केला. सूरज पांचोलीनं जियाचा खून केला, असा आरोप रबिया खान यांनी केला. मात्र सीबीआयच्या अहवालावर हायकोर्टानं ही हत्या नसून आत्महत्याच असल्याचं मान्य केलं होतं. आज या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात निकाल येणार आहे.
जियाच्या आईचे सूरजवर गंभीर आरोप
जियाने आत्महत्या केली नसून सूरजने पांचोलीने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. जियाची आई राबिया खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. यावर निकाल देत 2014 साली हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर 2019 सालापासून यावर सुनावणी सुरू झाली.
जिया खानने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सहा पानी सूसाईड नोट लिहिली होती. यात तिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जियाच्या आईने सूरजविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सूरजने या आरोपांचं खंडन करत आपण निर्दोष असल्याचा दावा केला. पण सूरजने जियाची हत्या केल्याचा आरोप राबिया खानने अनेक वर्ष लावून धरला.
30 जानेवारी 2020 रोजी सूरज पांचोलीविरोधातील आरोप निश्चित करण्यात आले. याप्रकरणी 2014 पासून ते आतापर्यंत 16 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या खटल्याप्रकरणी सूरजला आता अनेक समस्यांचा सामना करावा लादत आहे.
जियाने सहा पानी पत्र लिहित सूरजवर केले गंभीर आरोप
जिया खानने सहा पानी पत्र लिहित सूरज पांचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे सुरज काही दिवस तुरुंगात होात. पण त्याने जियाच्या आत्महत्येसाठी कधीही स्वत:ला जबाबदार धरलं नाही. मानसिक तणावामुळे जियाने टोकाचं पाऊल उचचलं असल्याचं सूरजने स्पष्टीकरण दिलं.
संबंधित बातम्या