Salman Khan Tiger 3 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.


'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 'टायगर 3' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. दिवाळी असूनही या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'टायगर 3'


सलमान खानचा 'टायगर 3' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'टायगर 3' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'टायगर 3' हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. 


'टायगर 3' या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचीदेखील (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळत आहे. आता भाईजानचा 'टायगर 3' किंग खानच्या 'पठाण' आणि 'जवान' (Jawan) या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


'टायगर 3' या सिनेमात सलमान खानसह कतरिना कैफदेखील (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात तिने जोयाची भूमिका साकारली होती. तसेच इमरान हाशमीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


सलमानला मोठा फटका; 'टायगर 3' ऑनलाईन लीक


सलमान खानचा 'टायगर 3' हा बहुचर्चित सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. एचडी क्वालिटीमध्ये हा सिनेमा वेगवेगळ्या साइट्स आणि टेलीग्रामवर लीक झाला आहे. 'टायगर 3' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर झाला आहे. 


सलमानच्या चाहत्यांमध्ये 'टायगर 3' या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाशमी, रेवती, रणवीर शौरी, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सलमानचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Tiger 3 : सलमानच्या 'टायगर'चा दिवाळी धमाका; मध्यरात्री शो, ब्लॅकमध्ये तिकीटांची विक्री, चाहत्यांचा जल्लोष; 'टायगर 3'ने दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा