मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'हसीना : द क्वीन ऑफ मुंबई' या सिनेमाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्याची एक झलक दाखवण्यात आला आहे.


सिनेमाचा टीझर अतिशय थ्रिलिंग आहे, त्यामुळे चित्रपटाविषीय अपेक्षा वाढली आहे. 1 मिनिट 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये, पती इब्राहिमच्या मृत्यूनंतर हसीनाचं आयुष्य कसं बदललं. त्या घटनेनंतर ती 'नागपाड्याची गॉडमदर' कशी बनली हे दाखवलं आहे.

'88 केस दर्ज लेकिन कोर्ट में हाज़िरी सिर्फ 1 बार' हे वाक्य टीझरमध्ये ऐकायला येतं, जे सिनेमाच्या पोस्टरवरही आहे.

टीझरच्या अखेरच्या सीनमध्ये श्रद्धा अर्थात हसीना कोर्टात उभी असून तिला नाव विचारलं जातं. यानंतर बॅकग्राऊंडमध्ये  'आपा याद रह गया ना! नाम याद रखने की ज़रूरत नहीं', असा श्रद्धाचा दमदार डायलॉग आहे.

अपूर्वा लखिया यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाची निर्मिती नाहिद खान यांनी केली आहे.

श्रद्धा कपूर हसीना पारकरची भूमिका साकारणार असून दाऊदच्या भूमिके अभिनेता सिद्धांत कपूर दिसणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील भाऊ-बहीण पडद्यावरही भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

6 जुलै 2014 रोजी हसीना पारकरचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

दाऊदच्या बहिणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूर, ‘हसीना पारकर’चं पोस्टर रिलीज

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरचा मृत्यू


पाहा टीझर