Ananya : बहुचर्चित अनन्या (Ananya) हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) अनन्या हे पात्र साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हृता दुर्गुळे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर तिच्या आगामी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत हृताने लिहिले आहे, देव कधीही चुकत नसतो, तो जादू करतो...पहा आनंदी अनन्याचा हॅपनिंग टीझर". हृताने शेअर केलेला टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. टीझरमुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 






अनन्याचा जिद्दीचा प्रवास उलगडणार!


'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकताच आऊट झालेल्या सिनेमाच्या टीझरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे. अनन्याचा जिद्दीचा प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनन्या सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते,"आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा सिनेमा आहे". 


प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा चित्रपट!


दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "यापूर्वी ‘अनन्या’ रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. मात्र, चित्रपट करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाटक पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. वयोगट आहे. यामुळे तरूणाई चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित होते. ‘अनन्या’ हा असा विषय आहे. जो कधीही जुना होणार नाही आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे. चित्रपट करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे नाटक करताना काही मर्यादा येतात. चित्रपट करताना बरीच मुभा असते. त्यात भव्यता आणू शकता. या ‘अनन्या’लाही प्रेक्षक तसेच भरभरून प्रेम देतील.’’ 


प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या'  या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केले आहे.  ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.


एकांकिका, नाटक ते सिनेमा.. असा आहे 'अनन्या'चा प्रवास


अनन्या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली होती. या सिनेमाच्या माध्यमातून हृता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रुईया महाविद्यालयाची 'अनन्या' एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर या एकांकिकेचे नाटकात रुपांतर करण्यात आले. नाटकात ऋतुजा बागवेने अनन्याचे पात्र साकारले होते. याआधी महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. 'अनन्या' सिनेमात हृता दुर्गुळे अनन्या देशमुख हे पात्र साकारत आहे. 


संबंधित बातम्या


Ananya : 'शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे'; हृता दुर्गुळेने शेअर केले 'अनन्या'चे पोस्टर


Ananya Official Teaser : अनन्याचा टीझर रिलीज; 23 जुलै रोजी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस