Zol Zaal : ‘झोलझाल’ (Zol Zaal) हा सिनेमा 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील  'फ्री हिट वाला नो बॉल, झाला झोलझाल' हे गाणे रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास आले आहे. हे गाणं गायिका वैशाली सामंत हिने स्वरबद्ध केलं असून वैशालीच्या या गाण्याने रसिक प्रेक्षक नक्कीच ठेका धरतील यात शंका नाही. 


आजवर वैशालीने गायलेली सर्वच गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. यात वैशालीने 'झोलझाल' या सिनेमात गायलेल्या 'झोलझाल' या मल्टीस्टारर गाण्याची रंगत काही औरच आहे. या गाण्यात सिनेमातील तब्बल 22 कलाकारांनी एकत्र येऊन त्यांच्या नृत्याने आणि त्यांच्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. 


गायिका वैशाली सामंतने स्वरबद्ध केलेल्या या झोलझाल या गाण्याच्या संगीताची संपूर्ण जबाबदारी प्रफुल्ल - स्वप्निल यांनी पेलवली. तर या गाण्याचे बोल गीतकार मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या गाण्यात वापरण्यात आलेल्या रॅप सॉंगच्या काही ओळी या वरून लिखाते यांच्या आहेत. या गाण्याला खरा साज चढलाय तो कलाकारांमुळे. 22 कलाकारांनी मिळून या मल्टिस्टारर सिनेमातील या झोलझाल या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. 


कलाकारांची मोठी फौज घेऊन येणार हास्याची मेजवानी


या चित्रपटातील गाण्यांना खरा साज चढलाय तो कलाकारांमुळे. या मल्टिस्टारर चित्रपाटात अभिनेते मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाळवे, अभिनेत्री प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.


दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाची निर्मिती निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली.


संबंधित बातम्या


Zol Zaal : रसिकांना मिळणार हास्याची नवी मेजवानी, 'झोलझाल' चित्रपटाची धमाकेदार गाणी रिलीज!


Zol Zaal : मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित