The Sabarmati Report:  मागील अनेक दिवसांपासून 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती.पण नुकतच या सिनेबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेला हा सिनेमा येत्या 3 मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. पण आता हा सिनेमा नव्या तारखेला रिलीज करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या टीमकडून सोशल मीडियावरुन ही माहिती देण्यात आलीये. 


विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा ही कलाकार मंडळी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे आता हा सिनेमा 2 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता या सिनेमाची आणखी वाट प्रेक्षकांना पाहावी लागणार आहे. पण या सिनेमाची तारीख थेट सेन्सॉर बोर्डाकडूनच बदलण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. 


सेन्सॉर बोर्डाकडून तारखेत बदल?


 'द साबरमती रिपोर्ट' या सिनेमाचा टीझर 27 फ्रेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर या सिनेमाची चर्चा होऊ लागली. त्यातच काही दिवसांपूर्वीच बालाजी मोशन पिक्चर्सने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली होती. हा सिनेमा 3 मे रोजी भेटीला येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता ही तारीख बदलली आहे. रिपोर्ट्सनुसार, बालाजी मोशन पिक्चर्सकडून  सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी हा सिनेमा पाठवण्यात आला होता. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाकडून रिलीजची तारीख बदलण्यात आली. कारण जर लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान हा सिनेमा प्रदर्शित झाला असता, तर मेकर्सना आचार संहितेसंबंधित अडचणींचा सामना करावा लागला असता. त्यामुळे या सिनेमाची तारीख 2 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 


सिनेमाची नवी तारीख जाहीर


राशी खन्नाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन सिनेमाच्या नव्या तारखेची घोषणा केली आहे. यावेळी तिने कॅप्शन देत म्हटलं की, 'द साबरमती रिपोर्टच्या फाइल पुन्हा एकदा खुलणार, 2 ऑगस्ट 2024 रोजी'. त्याचप्रमाणे सिनेमाचे निर्माते आणि अभिनेता विक्रांत मेस्सी याने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. 






ही बातमी वाचा : 


Digpal Lanjekar on Chinmay Mandlekar : 'अजूनतरी महाराजांची भूमिका चिन्मयच करणार', निर्णयावर दिग्पाल लांजेकरांनी नेमकं काय म्हटलं?