The Kerala Story : सत्याघटनांवर आधारित असलेल्या सिनेमांची निर्मिती करण्यावर निर्माते भर देत आहेत. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींची माहित नसलेली बाजू जाणून घेण्यास प्रेक्षकांनादेखील आवडत आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर ट्रेडिंगमध्ये आहे. या ट्रेलरला अल्पावधीतच 72 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक काय आहे? (The Kerala Story Movie)
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा केरळ राज्यातील एका गंभीर विषयावर भाष्य करणारा सिनेमा आहे. केरळमधून तरुण मुली आणि महिला आजही बेपत्ता होत आहेत. केरळमधून बेपत्ता झालेल्या तब्बल 32,000 मुली आणि महिलांचं नेमकं काय झालं त्या कुठे गेल्या यामागचं सत्य दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
'द केरळ स्टोरी'च्या ट्रेलरमध्ये काय आहे?
'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या ट्रेलरने सर्वांना हादरवून टाकलं आहे. 'द केरळ स्टोरी'च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच शालिनीला आयएसआयएसमध्ये (ISIS) सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. त्यावर उत्तर देत ती बोलत आहे,"मी आयएसआयएसशी जोडले गेले असले तरी मी इथे कशी आले हे माहिती असणं खूप गरजेचं आहे".
केरळमध्ये तरुण मुलींची कशी फसवणूक होते, त्यांचं ब्रेनवॉश कसं केलं जातं, हे दाखवण्यात आलं आहे. हिजाब घालणाऱ्या मुलींवर बलात्कार होत नाही, असं केरळमधील मुलींना सांगण्यात येतं. त्यामुळे या हिंदू मुली इस्लाम धर्म स्वीकारतात. त्यानंतर त्या मुलींना आयएसएसच्या आतंकवाद्यांसमोर उभं केलं जातं. त्यानंतर अंगावर शहारे आणणाऱ्या खेळाला सुरुवात होते.
'द केरळ स्टोरी' कधी प्रदर्शित होणार? (The Kerala Story Release Date)
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदा शर्मा या सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहे. शालिनी उन्नीकृष्णनच्या भूमिकेत ती दिसून येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेनने सांभाळली आहे. तर अमृतलाल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
ट्रेलर पाहा :
संबंधित बातम्या