Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi:  अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिने 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्येनंतर जिया खानच्या (Jiah khan) आईनं अभिनेता सूरज पांचोलीवर (Sooraj Pancholi) गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावर आता उद्या (28 एप्रिल)  स्पेशल सीबीआय कोर्ट हे अंतिम निकाल देणार आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोली  काही काळ तुरुंगात होता. त्यानंतर त्याची सुटका झाली. आता या 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणातून सूरज पांचोलीची सुटका होईल की, त्याच्या अडचणीत वाढ होईल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे.


जिया खान आत्महत्या प्रकरणासंदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीत स्पेशल सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर न्यायमूर्ती सय्यद यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. ते उद्या (28 एप्रिल)  निर्णय देतील. 


आत्महत्येपूर्वी जिया खानने लिहिले होते पत्र


 3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. जियाच्या मृत्यूनं मनोरंजनसृष्टी हादरली होती. आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. नंतर जियाच्या आईनं देखील सूरजवर आरोप केले होते. 


 जियाच्या आईनं सूरजवर केले गंभीर आरोप



17 ऑगस्ट रोजी जिया खानची आई राबिया खान यांनी न्यायाधीश एएस सय्यद यांच्यासमोर जियाच्या आत्महत्या प्रकरणी साक्ष नोंदवली. राबिया खान यांनी कोर्टाला जियाची बॉलिवूडमधील एन्ट्री, तिची कारकीर्द, आणि सूरज पांचोलीसोबतचे नाते याबद्दल सांगितले.  राबिया खान  यांनी सांगितलं होतं की, 'जियानं मला सांगितलं होतं की, सूरज हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा.' 


आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणात सूरज पांचोलीही काही काळ तुरुंगात होता. मात्र, सूरज पांचोलीने जिया खानच्या आत्महत्येसाठी कधीही स्वत:ला जबाबदार धरले नाही. तो म्हणाला होता की, जिया खानवर लहान वयातच कामाचा खूप ताण होता आणि त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. या ताणातून तिने हे पाऊल उचलले, असे त्याने म्हटले होते.


जिया खानचे चित्रपट


जिया खानने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. जिया खानने अमिताभ बच्चन यांच्यासोबत  'निशब्द' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. तसेच तिनं आमिर खानसोबत 'गजनी' आणि अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट 'हाऊसफुल'मध्ये काम केले. जियाच्या मृत्यूनंतर सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Jiah khan : 'सूरज माझ्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता'; जिया खानच्या आईनं न्यायालयात दिली माहिती