The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे पण काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पण काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात करमुक्त करण्यात आला. आता लवकरच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे. याबाबत उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एक ट्वीट शेअर करुन घोषणा केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, द केरळ स्टोरी हा चित्रपट उत्तर प्रदेश राज्यात करमुक्त करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाने सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह लोक भवन येथे होणाऱ्या विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात. उत्तर प्रदेश राज्यात अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट देखील करमुक्त करण्यात आला होता.
यूपीमधील भाजपचे सचिव राघवेंद्र मिश्रा यांनी नुकताच लखनऊमध्ये 100 विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवला. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 'टॅक्स फ्री' करणारे उत्तर प्रदेश हे मध्य प्रदेशानंतर दुसरे राज्य ठरले आहे. याआधी मध्य प्रदेश राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मध्य प्रदेश राज्यात करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली होती.
पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी' वर बंदी
"पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
'द केरळ स्टोरी' चित्रपटाची स्टार कास्ट
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या कलाकरांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 7.5 कोटींची कमाई केली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: