The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात करमुक्त करण्यात आल्याची घोषणा मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी काही यापूर्वी काही लोक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे द केरळ स्टोरी मध्य प्रदेशात करमुक्त करण्याची मागणी केली होती. आता शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मध्य प्रदेश राज्यात करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
काय म्हणाले शिवराज सिंह चौहान?
मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, ' 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि आतंकवाद यावर भाष्य करतो. लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्यानंतर मुलींचे आयुष्य कसं बरबाद होतं? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट आपल्यामध्ये जागरुकता निर्माण करतो. हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे. त्यामुळे मध्य प्रदेश राज्याचे सरकार या चित्रपटाला करमुक्त करत आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'दहशतवादाचे भीषण वास्तव समोर आणणारा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मध्य प्रदेशात करमुक्त करण्यात येत आहे.'
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट काल (5 मे) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 7.5 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: