The Kerala Story Box Office Collection : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण कॉन्ट्रोवर्सीचा या सिनेमाला चांगलाच फायदा झाला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 


'द केरळ स्टोरी' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज!


सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. एकंदरीत कॉन्ट्रोवर्सीचा (The Kerala Story Controversy) या सिनेमाला चांगलाच फायदा होत आहे. वीकेंड्ससह वीकडेजमध्येदेखील हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. आता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज आहे. 


'द केरळ स्टोरी'ची आठ दिवसांची कमाई जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection)


'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.05 कोटी, दुसरा दिवस 11.01 कोटी, तिसरा दिवस 16.43 कोटी, चौथा दिवस 10.03 कोटी, पाचवा दिवस 11.07 कोटी, सहावा दिवस 12.01 कोटी, सातवा दिवस 12.54 कोटी आणि आठव्या दिवशी 12.23 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 93.37 कोटींचा गल्ला जमवला आहे. 



  • पहिला दिवस - 8.05 कोटी

  • दुसरा दिवस - 11.01 कोटी

  • तिसरा दिवस - 16.43 कोटी

  • चौथा दिवस - 10.03 कोटी

  • पाचवा दिवस - 11.07 कोटी

  • सहावा दिवस - 12.01 कोटी

  • सातवा दिवस - 12.54 कोटी

  • आठवा दिवस - 12.23 कोटी


'द केरळ स्टोरी' हा सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 200 कोटींचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता भारतात चांगला गल्ला जमवल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे. 40 देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जगभरातील सिनेप्रेमींकडून या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 






'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma), योगिता बिहानी (Yogita Bihani), सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  


संबंधित बातम्या


The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'चा आजपासून नवा अध्याय सुरू; भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आता जगभरात होणार रिलीज