The Kerala Story Worldwide Release : सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे. 


'द केरळ स्टोरी' जगभरात प्रदर्शित!


'द केरळ स्टोरी' हा सिनेमा भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता आजपासून हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत हा सिनेमा 60 लाखपेक्षा अधिक सिनेप्रेमींनी पाहिला आहे. आता हा सिनेमा 40 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 


'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक सुदीप्तो सेन भारावला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की,"भारतातील 60,00,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा पाहिला आहे. आजपासून नवीन अध्याय सुरू झाला आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आज 40 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. कमाईचे आकडे वाढत चालले आहेत. तुमचं प्रेम असचं राहुदेत". 






'द केरळ स्टोरी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका...


'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 8.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी, तिसऱ्या दिवशी 16.40 कोटी, चौथ्या दिवशी 10.07, पाचव्या दिवशी 10.07 कोटी, सहाव्या दिवशी 11.14 आणि सातव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 81.36 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी'


'द केरळ स्टोरी' हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रिलीजआधीपासून या सिनेमावर टीका होत होती. आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी हे कलाकार 'द केरळ स्टोरी' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेरसह अनेक बड्या कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. देशभरात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं काही मंडळींचं मत असलं तरी सिनेमा म्हणून उत्तमप्रकारे या सिनेमाची बांधणी केली आहे, असं प्रेक्षकांचं मत आहे. 


संबंधित बातम्या


The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; सहाव्या दिवशी केली एवढी कमाई