The Kerala Story Box Office Collection Day 10 : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. रिलीजआधी अनेकांनी या सिनेमाला विरोध केला. पण दुसरीकडे रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. दोन्ही वीकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.
रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर 'द केरळ स्टोरी'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. वीकेंडसह इतर दिवशीदेखील सिनेप्रेमी हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जात आहेत. भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता रिलीजच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने 23 कोटींची कमाई केली आहे.
'द केरळ स्टोरी'चं दहा दिवसांचं कलेक्शन जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection)
- पहिला दिवस - 8.05 कोटी
- दुसरा दिवस - 11.01 कोटी
- तिसरा दिवस - 16.43 कोटी
- चौथा दिवस - 10.03 कोटी
- पाचवा दिवस - 11.07 कोटी
- सहावा दिवस - 12.01 कोटी
- सातवा दिवस - 12.54 कोटी
- आठवा दिवस - 12.23 कोटी
- नऊवा दिवस - 19.50 कोटी
- दहावा दिवस - 23 कोटी
- एकूण कमाई - 135.99 कोटी
'द केरळ स्टोरी'ची वाटचाल 200 कोटींच्या दिशेने
'द केरळ स्टोरी' या सिनेमाने प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवली आहेत. रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने 135.99 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत.
चांगलं कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय, आणि सुदीप्तो सेन यांचं कमाल दिग्दर्शन या सर्व गोष्टींमुळे 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाचे महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात येत आहेत. तर कुठे हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
कर्नाटक निकालाने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा दावा करत खासदार इम्तियाज जलील )Imtiyaz Jalil) यांनी 'द केरळ स्टोरी'चे दोन तिकीटं नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि आणि अमित शाहांना (Amit Shah) स्पॉन्सर करणार असल्याचे सांगितले आहे.
संबंधित बातम्या