The Kerala Story Box Office Collection Day 5 : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काही ठिकाणी या सिनेमाला विरोध होत आहे. तर काही ठिकाणी मात्र या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहे. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.


'द केरळ स्टोरी'ची कमाई जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection Day 5)


'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 8.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी, तिसऱ्या दिवशी 16.40 कोटी आणि चौथ्या दिवशी 10.07 कोटींची कमाई केली आहे. तर पाचव्या दिवशी या सिनेमाने 11 कोंटीची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 57.62 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'द केरळ स्टोरी'ला 'या' राज्यात बंदी


तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्येदेखील मुलींना हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहेत. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'द केरळ स्टोरी'


'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धि इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमातील सर्वच कलाकारांचं त्यांच्या दर्जेदार अभिनयाचं सध्या कौतुक होत आहे. सुदीप्तो सेनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेरसह अनेक बड्या कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. देशभरात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं काही मंडळींचं मत असलं तरी सिनेमा म्हणून उत्तमप्रकारे या सिनेमाची बांधणी केली आहे, असं प्रेक्षकांचं मत आहे. 


'द केरळ स्टोरी' हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाला यश आलं आहे.


संबंधित बातम्या


The Kerala Story : कुठे मोफत शो तर कुठे महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग; भाजप नेत्यांचा 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा!