Mumbai : चित्रीकरणासाठी मुंबईत (Mumbai) आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 38 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीची दखल घेत मरिन ड्राइव्ह (Marine Drive) पोलिसांनी बलात्कार, मारहाण व धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेल्या तरुणीच्या बाबतीत घडली धक्कादायक घटना
मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. या शहरात नशीब आजमावण्यासाठी गावागावाहून अनेक मंडळी येत असतात. यात प्रामुख्याने तरुण मंडळींचा समावेश असतो. शाहरुख, सलमान, आलियाप्रमाणे आपणंही सेलिब्रिटी व्हावं असं स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठी अनेक खेड्यातील मुलं-मुली मुंबईत येत असतात. दरम्यान अशाचप्रकारे नशीब आजमावण्यासाठी आलेल्या मुलीच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
हरियाणा (Haryana) येथील एक 19 वर्षीय मुलगी चित्रीकरणासाठी मुंबईत (Mumbai) आली होती. दरम्यान नरीमन पॉईंट (Nariman Point) येथील एका नामांकीत हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. आरोपीने तरुणीला मारहाण करुन चाकूने तिच्या तोंडात, पोटावर व मांडीवर जखमा केल्या आहेत. आता याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी (Mumbai Police) बलात्कार, मारहाण व धमकावल्याचा गुन्हा दाखल करत 38 वर्षीय आरोपिला अटक केली आहे.
चित्रीकरणासाठी मुंबईत आलेली तरुणी आणि आरोपी दोघेही मूळचे हरियाणाचे आहेत. आरोपी तरुणीसोबत रिलेशनमध्ये होता. त्यामुळे तोदेखील तिच्यासोबत चित्रीकरणासाठी मुंबईत आला होता. दरम्यान रविवारी रात्री नरिमन पॉईंट येथील हॉटेलमध्ये त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली.
38 वर्षीय आरोपीला पोलिसांनी केली अटक
आरोपिने तरुणीच्या तोंडार, पोटावर आणि मांडीवर चाकू टोचून जखम केली. तसेच चाकूच्या सहाय्याने तिच्या गुप्तांगावर जखमा केल्या. त्यामुळे तरुणी घाबरली आणि तिने मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
मुंबईत अनेकदा नवोदित कलाकारांना प्रामुख्याने महिला कलाकारांना अत्याचार, बलात्कार या गोष्टींचा सामना करावा लागतो. काम मिळवून देतो असं सांगून आजवर अनेक नवोदित महिला कलाकारांना फसवण्यात आलं आहे. शारीरिक संबंध ठेवल्यास लगेचच काम देऊ असं सांगून मुलींची फसवणूक करण्यात येते. बॉलिवूडमध्ये अनेक नामांकित कलाकारांनादेखील या प्रकरणाचा सामना करावा लागत आहे.
संबंधित बातम्या