The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. तर दुसरीकडे या सिनेमाचं कथानक खोटं असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाच्या कथानकावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. केरळ सरकारदेखील या सिनेमाला विरोध करत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाच्या कथानकात मोठा बदल करण्यचा निर्णय घेतला आहे. 


'द केरळ स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये 32000 मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी यात बदल केला आहे. या सिनेमाच्या नवीन टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 32000 मुलींच्या ऐवजी नव्या टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 महिलांचा ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मांतर करुन त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते, असं म्हटलं आहे. 


'द केरळ स्टोरी'ला सेन्सॉर बोर्डने दिलं ए सर्टिफिकेट


सेन्सॉर बोर्डने 'द केरळ स्टोरी' या सिनेमातील 10 सीन्स काढून टाकण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार,"भारतीय कम्युनिस्ट सबसे बडे पाखंडी है' या डायलॉगमधील 'भारतीय' हा शब्द काढून टाकण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. तसेच या सिनेमाला ए सर्टिफिकेटदेखील दिलं आहे. त्यामुळे आता हा सिनेमा वर्षांपुढील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


मुस्लिम समाज 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या कथानकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा असल्याचं म्हटलं जात आहे. आता केरळ राज्यातील या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. दरम्यान 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. 


'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रपोगंडा म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना निर्माते विपुल शाह म्हणाले की,"द केरळ स्टोरी' हा प्रपोगंडा असल्याचं म्हणण खूप सोपं आहे. पण या सिनेमावर टीका करणाऱ्यांनी मुळातच हा सिनेमा पाहिलेला नाही. सिनेमा न पाहताच ते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. 


'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेनने सांभाळली आहे. या सिनेमात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तर योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी, विजय कृष्णा, प्रणव मिश्रा आणि प्रणय पचौरी हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



संबंधित बातम्या


The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'चं कथानक सत्य असल्याचं सिद्ध करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस; मुस्लिम युथ लीगचं आव्हान