Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या सहा महिन्यांपासून 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. राज्यभरात तिच्या 'त्या' व्हिडीओची चर्चा झाली. कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीने पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी पुणे पोलिसांना (Pune Police) मोठं यश आलं आहे. गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. गौतमीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अनेक मंडळी तिच्या पाठिशी उभे राहिले. राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 


नेमकं प्रकरण काय? (Gautami Patil Viral Video Case)


गौतमी पाटीलचा 24 फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ (Gautami Patil Viral Video) शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला. त्यानंतर गौतमी पाटीलसोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलीस या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. 


गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. या प्रकरणावर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महिला कलावंतांसह अनेक राजकारणी मंडळींनीदेखील यावर आवाज उठवला. 


व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर गौतमी म्हणालेली...


कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील म्हणाली होती,"व्हिडीओ व्हायरल प्रकरणावर बोलण्याची माझी मनस्थिती नाही. प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्या विषयावर मला काही बोलायची इच्छा नाही". 


गौतमी पाटील या नावाची खूपच चर्चा आहे. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. आपल्या नृत्याने गौतमीने सर्वांना वेड लावलं आहे. तर दुसरीकडे ती आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. पण तरीही तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. गौतमीचा 'घुंगरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. 


संबंधित बातम्या


Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर यांची ट्वीटद्वारे माहिती