मुंबई : हॉलिवूड दिग्दर्शक जॉन फेवरो दिग्दर्शित 'द जंगल बुक'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दहा दिवसात सिनेमाने 100 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे.

 

'द जंगल बुक' पहिल्यांदा भारतात रिलीज झाला. 8 एप्रिलला भारतात प्रदर्शित झाल्यानंतर हा  चित्रपट आठवडाभराने अमेरिकेत रिलीज झाला.

 

‘द जंगल बुक’ आणखी सुसाट, विकेंडला बक्कळ कमाई



भारतीय बॉक्स ऑफिसवर द जंगल बुकने आतापर्यंत 101.82 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 40.19 रुपये कमावले होते.

 

ना 100, ना 200, ना 300 कोटी, अवघ्या सात दिवसात 'द जंगल बुक'ची कमाई...


 

बॉलिवूड ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "द जंगल बुक'च्या कमाईचा वेग दुसऱ्या आठवड्यात कायम आहे. चित्रपटाने शुक्रवारी 8.02 कोटी, शनिवारी 8.51 कोटी आणि रविवारी 10.67 कोटी रुपये कमावले. एकूण कमाई 101.82 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जबरदस्त"

https://twitter.com/taran_adarsh/status/721927485189820416

बॉक्स ऑफिसवर 'जंगल जंगल सुसाट चली है...'



मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किप्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित ‘जंगल बुक’ हे कार्टून जगभरात गाजलं होतं. त्यावर आधारित द जंगल बुक हा सिनेमा आहे. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. मोगलीची भूमिका साकारणारा लहानगा नील सेठीवर सर्व प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रियंका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर, ओम पुरी, शेफाली शाह, नील सेठी यांचे व्हॉईस ओव्हर व्यक्तिरेखांना लाभले आहेत.