Family Man Actress Fell on Stairs: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या आगामी वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन 3’ (The Family Man) मुळे प्रचंड चर्चेत आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील या लोकप्रिय सिरीजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. आता तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. पण या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान घडलेली एक घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Family Man OTT)
ट्रेलर लॉन्चदरम्यान पायऱ्यांवरून घसरली, Video Viral
‘द फॅमिली मॅन’ मध्ये मनोज बाजपेयींची ऑन-स्क्रीन मुलगी ‘ध्रुती तिवारी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्लेषा ठाकूर ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात पायऱ्यांवरून उतरताना पडली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की, अश्लेषा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि हाय हिल्स घालून कार्यक्रमात सहभागी झाली होती. मात्र, स्टेजवरून पायऱ्या उतरताना तिचा तोल गेला आणि ती खाली घसरली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होतोय.
घटनेनंतर उपस्थित लोकांनी तिला तात्काळ सावरलं. अभिनेत्री प्रियामणीने स्वतः पुढे येऊन अश्लेषाला सावरलं. सुदैवाने, तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली असून, चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिच्या उंच हिल्सवरूनही कमेंट केल्या आहेत. कशाला घालायच्या एवढ्या उंच हिल्स... काहींनी काही हरकत नाही होत असत... अशा कमेंट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
मनोज बाजपेयी पुन्हा एकदा धमाल करणार!
या सिझनमध्ये आधीच्या कलाकारांसोबत काही नवे चेहरेही झळकणार आहेत. मनोज बाजपेयींच्या जोडीला शरीब हाश्मी पुन्हा दिसणार आहेत, तर यावेळी दमदार अभिनेता जयदीप अहलावत खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे.
सिरीजचा तिसरा भाग 21 नोव्हेंबरला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलर पाहूनच या सिझनमध्ये अधिक अॅक्शन, सस्पेन्स आणि भावना यांचा तडका मिळणार असल्याचं स्पष्ट होतं. मनोज बाजपेयींचा ‘श्रीकांत तिवारी’ पुन्हा एकदा मिशनवर परतणार आहे आणि त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा संघर्षही दाखवला जाणार आहे. ‘द फॅमिली मॅन 3’ हा नोव्हेंबर महिन्यातील सर्वात मोठा ओटीटी रिलीज मानला जात आहे.