Katrina Kaif Vicky Kaushal Blessed With Baby Boy: बॉलिवूडचं (Bollywood News) लाडकं सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple) विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. वयाच्या 42व्या वर्षी कतरिनानं बाळाला जन्म (Katrina Kaif Blessed With Baby Boy) दिलाय. दोघांनी सोशल मीडियावर गूड न्यूज शेअर केल्यानंतर कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच, कतरिना-विक्कीच्या बाळाच जन्म 7 नोव्हेंबरला झालाय. बाळाच्या जन्म तारखेचं आणि त्याच्या आई-वडिलांच्या जन्म तारखेचं एक खास कनेक्शन आहे.
विक्की-कतरिनाच्या बाळाच्या बर्थडेटशी बाळाचं कनेक्शन
विक्की-कतरिनाच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. अद्याप कपलनं आपल्या बाळाची झलक दाखवलेली नाही. पण, कौशल कुटुंबाच्या चिमुकल्या राजकुमाराची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. तसेच, बाळाच्या जन्मतारखेचं बाळाच्या जन्मतारखेशी खास कनेक्शन आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या बाळाचा जन्म 7 नोव्हेंबरला झालाय. तर, विक्की-कतरिनाच्या बर्थ डेटची न्यूमरोलॉजीमध्ये टोटल 7 येते. कतरिनाची बर्थ डेट 16 जुलै आहे, तर विक्कीची बर्थडेट 16 मे रोजी 1988 आहे.
न्यूमरोलॉजीच्या अँगलनं विचार केला तर, सेलिब्रिटी कपलचा मूलांक 7 आहे. तर, त्यांच्या बाळाची बर्थडेटही 7 आहे. त्यामुळे विक्की आणि कतरिनाच्या बाळाचा मूलांक 7 असणं हा निव्वळ योगायोग आहे की, प्लान्ड... हे सेलिब्रिटी कपललाच माहीत. पण, हल्ली ही बाब सामान्य झाली आहे. कित्येक जोडपी पंचागानुसार, आपल्या डिलिव्हरीचा प्लान करतात.
कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव
कतरिनाच्या बाळाचा मूलांक 7 आहे. 7 मूलांक असलेले लोक बुद्धिमानी, मेहनती आणि सक्सेसफुल असतात, असं म्हटलं जातं. विक्की कौशल आणि कतरिना कैफचं करिअर आणि व्यक्तिमत्व पाहिलं तर याचा पुरावाही मिळतोच.
विक्की आणि कतरिना 2021 मध्ये लग्न केलेलं. गेल्या कित्येक दिवसांपासून कतरिनाच्या प्रेग्नंसीबाबत चर्चा सुरू होत्या. पण, अभिनेत्रीनं कधीच या चर्चांना उत्तर दिलं नाही. कपलनं याचवर्षी 23 सप्टेंबरला आपली प्रेग्नंसी अनाउंस केलेली.
कतरिना आणि विक्कीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, कतरिना कैफ सर्वात शेवटी 'मेरी क्रिसमस'मध्ये झळकलेली. त्यानंतर ती स्क्रिनवर दिसलीच नाही. तर, विक्कीचे कित्येक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्याची अपकमिंग फिल्म लव्ह अँड वॉर असेल. यामध्ये विक्कीसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :