Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' (Ekda Kay Zala) या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आल्यापासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकही प्लास्टिकची बाटली वापरण्यात आली नाही.


'एकदा काय झालं' या सिनेमाचा भाग असलेल्या पूर्वा पंडितने सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची एक खास गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 'एकदा काय झालं' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकही प्लास्टिकची बाटली वापरण्यात आली नसल्याची माहिती पूर्वाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. 



टीकाऊपणाच्या दृष्टीने प्रवास करण्याचा प्रयत्न 'एकदा काय झालं'च्या सेटवर प्रोडक्शन टीमकडून करण्यात आला आहे. नेहमी वापरत असलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स न वापरता स्टीलच्या बॉटल्स प्रत्येक माणसाला त्याचं नाव टॅग करून देण्यात आल्या. त्यानिमित्ताने प्लास्टिकचा होणारा अमाप वापर टाळता आला. 


पूर्वा पंडितने लिहिलं आहे,"छोट्या छोट्या उपक्रमातून आपण पृथ्वीसाठी काही करत राहिलो तर सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून तिला निरोगी ठेवण्यात आपण यशस्वी होऊ.. अशा बऱ्याच उपक्रमांनी युक्त 'एकदा काय झालं' हा सिनेमा आहे". 


5 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज 


'एकदा काय झालं' हा सिनेमा 5 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. डॉ. सलील कुलकर्णीने लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी या सिनेमात केली आहे. वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला 'एकदा काय झालं' हा सिनेमा आहे. आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी असलेला हा सिनेमा आहे. प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; सुमीत राघवन मुख्य भूमिकेत


Google Mid Year Search 2022 List : आलिया भट ते कतरिना कैफ; गुगल सर्चवर बॉलिवूड कलाकरांचा दबदबा