Jacqueline Fernandez Bail : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलिनच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय आज निर्णय देणार आहे. त्यामुळे जॅकलिनला जामिन मिळणार की अटक होणार हे आज स्पष्ट होणार आहे. 


जॅकलिनची याआधी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली होती. दरम्यान विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतरिम जामिनावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता. त्यानंतर हा निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडला. 


10 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन म्हणाली,"तपास यंत्रणेला मी सहकार्य करत आहे. पण तरीही ईडी मला त्रास देत आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जाते. पण मला परदेशात जाण्यासाठी आडवण्यात आलं. मला माझ्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. याप्रकरणी तपास यंत्रणेला मेल केला असता त्यांच्याकडून यासंदर्भात उत्तर मिळालेले नाही. ईडीचे सर्व आरोप निराधार आहेत". 






ईडीच्या वतीने एक वकिल म्हणाले,"जॅकलिन ही परदेशी नागरिक आहे. तिचे कुटुंब श्रीलंकेत राहते. जॅकलिनने डिसेंबर 2021 मध्येही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. 22 ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने जामीन याचिकेवर सुनावणी करताना जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला होता".


200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार : ईडी


ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे.


नेमकं प्रकरण काय?


200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.  


संबंधित बातम्या


Jacqueline Fernandez: 'जॅकलिनला अटक का केली नाही?' न्यायालयाचा ईडीला प्रश्न, वाचा आज कोर्टात काय घडलं