Aamir Khan Taking Break From Films : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळेच आमिरने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


आमिर खान एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला,"एखादी भूमिका साकारताना मी त्या भूमिकेला 100 टक्के देत असतो. दिवस-रात्र मी फक्त त्या भूमिकेचाच अभ्यास करत असतो. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमानंतर मी 'चॅम्पियन्स' (Champions) नावाचा सिनेमा करणार होतो. उत्कृष्ट कथानक असलेला हा गोड सिनेमा आहे. पण मला सध्या सिनेसृष्टीपासून ब्रेक हवा आहे. मला सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे."


आमिर घेणार दीड वर्षांचा ब्रेक!


आमिर खानने दीड वर्ष सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 35 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. आजवर कुटुंबापेक्षा सिनेमाकडे मी जास्त लक्ष दिलं आहे. त्यामुळे कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी आमिरने हा निर्णय घेतला आहे. 






'चॅम्पियन्स'ची करणार निर्मिती!


'चॅम्पियन्स' हा आमिर खानचा आगामी सिनेमा आहे. 'चॅम्पियन्स' सिनेमाची कथा आमिरच्या पसंतीस उतरल्याने त्याने या सिनेमात अभिनय न करता सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा फ्लॉप ठरल्याने प्रेक्षक आता 'चॅम्पियन्स' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


'लाल सिंह चड्ढा' ओटीटीवर रिलीज


'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहू शकतात. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव आणि वायकॉम 18 स्टडियोजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आमिरसोबत या सिनेमात अभिनेत्री करिना कपूर, मोना सिंह आणि अभिनेता नागा चैतन्य महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा फॉरेस्ट गंप या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे. 


संबंधित बातम्या


Salaam Venky: आई आणि मुलाच्या नात्याची कथा; काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज