June Movie Release : कोरोना प्रादुर्भावामुळे सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक निर्माते त्यांचे सिनेमे प्रदर्शित करत आहेत. मे महिन्यात 'भूल भुलैया 2' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता जून महिन्यातदेखील अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


सिनेमाचे नाव: पृथ्वीराज
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार प्रदर्शित : 3 जून 2022


'बच्चन पांडे' सिनेमागृहात फ्लॉप झाल्यानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. अक्षयचा 'पृथ्वीराज' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. यश राज फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाचे कथानक हे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  मानुषी छिल्लर या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सिनेमाचे नाव : मेजर
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार प्रदर्शित : 3 जून 2022


शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. अदिवी शेष या सिनेमात मुख्य भूमिकेत असून तो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित या सिनेमात आदिवी शेष व्यतिरिक्त सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा आणि शोभिता धुलीपाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


सिनेमाचे नाव : विक्रम
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 3 जून 2022


दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन 'विक्रम' सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'विक्रम' सिनेमात कमल हासन अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


सिनेमाचे नाव : जनहित में जारी
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 10 जून 2022


'जनहित में जारी' या सिनेमात अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे. 'जनहित में जारी' हा सिनेमा 10 जूनला देशभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात एका तरुण मुलीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. 


सिनेमाचे नाव : निकम्मा
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 17 जून 2022


'निकम्मा' हा एक अॅक्शनपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केले आहे. या सिनेमात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दस्सानी, शिर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सिनेमाचे नाव : जुग जुग जिओ
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह
कधी होणार रिलीज : 24 जून 2022


राज मेहता दिग्दर्शित 'जुग जुग जिओ' सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल आणि यूट्यूबर प्राजक्ता कोळी दिसणार आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे. 


संबंधित बातम्या


Prithviraj : 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव बदलणार; यशराज फिल्म्सने मान्य केली करणी सेनेची मागणी मान्य


Dhaakad : कंगनाचा 'धाकड' ठरला सुपरफ्लॉप; रिलीजच्या आठव्या दिवशी देशभरात 20 तिकिटांची विक्री