Prithviraj Name Change : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा येत्या 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. करणी सेनेने या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यानुसार यशराज फिल्म्सने करणी सेनेची मागणी मान्य केली आहे. 


'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव बदलणार 


यशराज फिल्म्सने करणी सेनेची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव बदलण्यात येणार आहे. ‘पृथ्वीराज’ सिनेमाचं नाव बदलण्यात यावं, अशी करणी सेनेने यशराज फिल्समच्या सीईओंकडे मागणी केली होती. 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव 'सम्राट पृथ्वीराज' असावे अशी मागणी करणी सेनेने केली होती. आता यशराज फिल्म्सने ही मागणी मान्य केली आहे. 


'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव होणार 'सम्राट पृथ्वीराज'


यशराज फिल्म्सने करणी सेनेचे प्रवक्ते सुरजीत सिंह राठोड यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सिनेमाचे नाव बदलणार असल्याचे लिहिले आहे. पत्रात लिहिण्यात आले आहे की, 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव 'सम्राट पृथ्वीराज' असे ठेवण्यात येणार आहे. 


सुरजीत सिंह राठोड म्हणाले होते, ‘पृथ्वीराज’ सिनेमाचं नाव बदलण्यात आलं नाही तर हा सिनेमा आम्ही राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही. राजस्थानमधील सिनेमागृहांना यासंदर्भात माहिती दिलेली आहे. सिनेमाचे नाव जर ‘पृथ्वीराज’ असेल तर या सिनेमाला राजस्थानमध्ये प्रदर्शित करण्यास करणी सेना परवानगी देणार नाही. 


'पृथ्वीराज' या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. यश राज फिल्म्सनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. रिपोर्टनुसार, सिनेमाचे कथानक हे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  मानुषी छिल्लर या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Prithviraj Controversy : ‘पृथ्वीराज’ सिनेमा पुन्हा चर्चेत; सिनेमाचं नाव बदला, करणी सेनेची मागणी


Prithviraj : रिलीजपूर्वीच अमित शाह पाहणार 'पृथ्वीराज' सिनेमा; दिल्लीत होणार स्पेशल स्क्रीनिंग