Thalapathy Vijay Leo Firt Twitter Review : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' (Leo) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दणदणीत कमाई केलेला हा सिनेमा पाहायला मोठ्या संख्येने प्रेक्षक सिनेमागृहात जात आहेत. बॉक्स ऑफिसवर 'लियो' सुसाट सुटला आहे. थिएटरबाहेर चाहते गर्दी करत आहेत. तसेच 'लियो' हा ब्लॉकबस्टर सिनेमा असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. 


थलापती विजय अभिनीत 'लियो' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) यांनी सांभाळली आहे. अॅक्शनचा तडका असलेल्या या थरार नाट्यमय सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'लियो' या सिनेमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिलं आहे,"थलापती विजयने कमाल काम केलं आहे. हा सिनेमातील अॅक्शन सीन्स पाहताना अंगावर शहारे येतात. नक्कीच 'लियो' हा सिनेमा ब्लॉकबस्टर होईल". 














एका चाहत्याने लिहिलं आहे,"लियो' हा एक शानदार सिनेमा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सिनेमा पाहायलाच हवा. लियोसमोर  रजनीकांतचा जेलर काहीच नाही". एका युट्यूबरने लिहिलं आहे,"थलापती विजयच्या करिअरमध्ये लियो सिनेमाचा मोठा वाटा आहे. या सिनेमातील एकही दृश्य मीस करण्याची हिंमत करू नका". 






'लियो' सिनेमातील एका सीनचा व्हिडीओ व्हायरल


यूकेमध्ये लियो या सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर या सिनेमातील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण तरीही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा अंदाज आहे. 


'लियो' या सिनेमात विजय सेतुपतीसह तृषा कृष्णन, अर्जुन सरजा, गौतम मेनन, मैसस्किन आणि प्रिया आनंद महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकेल. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Thalapathy Vijay : थलापती विजयच्या अडचणीत वाढ; 'Leo'च्या रिलीजवर बंदी; नेमकं प्रकरण काय?