Scam 2003 Part 2 Trailer Out : हंसल मेहता (Hansal Mehta) यांची 'स्कॅम 1992' (Scam 1992) ही वेबसीरिज चांगलीच गाजली असून आता ते 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी पार्ट 2' (Scam 2003 The Telgi Story Part 2) या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हंसल मेहता आणि तुषार हीरानंदानीची जोडी सज्ज आहे. आता या बहुचर्चित सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी पार्ट 2'चा ट्रेलर आऊट! (Scam 2003 Part 2 Trailer Out)


हंसल मेहता यांनी 'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी पार्ट 2' या सीरिजचा ट्रेलर आऊट केला आहे. कर्नाटकातील खानापूरमधील एक घोटाळेबाज फळविक्रेता अर्थात अब्दुल करीम तेलगीची गोष्ट या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. देशातील 18 राज्यांमध्ये सुरू असलेला हा प्रकार, यात कोण-कोण सामील होतं हे सर्व या सीरिजमध्ये पेक्षकांना पाहायला मिळेल. 






स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा प्रकार नेमका कसा वाढला, यात कोणत्या राजकारण्यांचा सहभाग होता, किती कोटींचा हा घोटाळा होता अशा सर्व गोष्टी 'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी पार्ट 2'मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही प्रेक्षकांना दमदार संवाद आणि नाट्य पाहायला मिळेल. 30 कोटींच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा शेवट नक्की कसा झाला ते प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळेल.


हंसल मेहता यांनी 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी पार्ट 2'चा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे,"आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत. सबकी जुबान पे था तेलगी का नाम, पर तेलगी की जुबान पे किसका? 3 नोव्हेंबरला जाणून घ्या". 


'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी पार्ट 2' (Scam 2003 The Telgi Story Part 2 Trailer Release Date)


'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी पार्ट 2' या सीरिजमध्ये गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बालसेवर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नापारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्राशेखर, अजय जाधव, दिनेश लाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित या सीरिजची निर्मिती तुषार हिरानंदानी यांनी केली आहे. 3 नोव्हेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


संबंधित बातम्या


Scam 2003 Teaser : 'स्कॅम 1992' नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी'