Thalapathy Vijay Leo Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' (Leo) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवत आहेत. आता 'लियो' (Leo) या सिनेमाने रिलीजआधीच 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे. 


'लियो'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला


'लियो' हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दुसरीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'लियो' या सिनेमाने भारतात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 32 कोटी आणि 'जवान' (Jawan) या सिनेमाने 40 कोटींची कमाई केली आहे. 


'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. केरळमध्ये हा सिनेमा चांगलीच कमाई करेल असा अंदाज आहे. केरळमध्ये अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 7.5 कोटींची कमाई केली आहे.  थलापती विजयची दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत चांगलीच क्रेझ आहे. 'लियो' या सिनेमाची थलापतीचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 


लोकेश कनगराज यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'लियो' या सिनेमात थलापती विजयसह संजय दत्त, अर्जुन सरजा आणि तृषा कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'लियो' या बहुचर्चित सिनेमाचा रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे.






थलापती विजय गाजवणार बॉक्स ऑफिस


थलापती विजयचा 'वरिसु' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमाही सुपरहिट ठरला. त्याआधी त्याचा 'मास्टर' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन जमवलं. आता पुन्हा एकदा 'लियो' सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवायला थलापती विजय सज्ज आहे.


थलापती विजयने मोडला शाहरुखचा रेकॉर्ड!


यूकेमध्ये आतापर्यंत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या सिनेमांनी सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन जमवलं आहे. शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाला सर्वाधिक ओपनिंग मिळालं होतं. 'पठाण'ने रिलीजच्या दिवशी दिवशी 3 कोटी 22 लाख रुपयांची कमाई केली होती. तर 'लियो'ने पहिल्या दिवशी आतापर्यंत 3 कोटी 23 लाखांची कमाई केली आहे. यूएसएमध्ये लियो हा चित्रपट 2D ते XD ते IMAX आणि RPX पर्यंतच्या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.


संबंधित बातम्या


Thalapathy Vijay : थलापती विजयने मोडला शाहरुखचा रेकॉर्ड! 'Leo'ने परदेशात रचला विक्रम