Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon) यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील लाल पीली अखियां हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे. तसेच या ट्रेलरमध्ये कृती एका रोबोटची भूमिका साकारताना दिसत आहे.


रोबोट आणि माणसाची जबरदस्त लव्ह स्टोरी


'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात शाहिद आणि कृती यांच्या रोमँटिक सीननं होते. यामध्ये शाहिद हा कृतीचं भरभरुन कौतुक करताना दिसतो. तसेच शाहिद आणि कृतीचा इंटिमेट सीन देखील ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. अशातच ट्रेलरमध्ये दिसते की, कृती ही सर्वसामान्य मुलगी नसून सिफरा नावाची एक रोबोट आहे. शाहिद हा सिफराला लग्नासाठी प्रपोज करतो आणि सुरु होते रोबोट आणि माणसाची प्रेमकहाणी. आता या प्रेमकहाणीमध्ये कोणकोणते ट्वीस्ट येणार? याचं उत्तर प्रेक्षकांना 9 फेब्रुवारीला मिळणार आहे.


पाहा ट्रेलर:






'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' ची स्टार कास्ट


'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात कृती आणि शाहिद यांच्यासोबतच  धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. अमित जोशी आणि आराधना साह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात कृती आणि शाहिद यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


गेल्या वर्षी शाहिदचा  जर्सी हा चित्रपट रिलीज झाला होता. तर कृती ही आदिपुरुष या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता कृती आणि शाहिद हे 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: क्रिती आणि शाहिदचा रोमँटिक अंदाज; 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' 'या' दिवशी होणार रिलीज