Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Anant Ambani Radhika Merchant : मुहूर्त ठरला! अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; वेडिंग कार्ड पाहिलंत का?
Anant Ambani Radhika Merchant : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. अनंत-राधिका येत्या 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. शाही थाटात मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या दिमाखदार लग्नसोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Panchayat 3 : 300 गावं पालथी घातल्यानंतर मिळालंय 'फुलेरा गाव', भर उन्हात कलाकारांना घालावं लागलं स्वेटर; जाणून घ्या 'पंचायत 3'बद्दलचे पाच मजेदार किस्से
Panchayat 3 : 'पंचायत 3' (Panchayat 3) ही बहुप्रतीक्षित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. प्राईम व्हिडीओच्या (Prime Video) सर्वाधिक लोकप्रिय सीरिजमध्ये 'पंचायत'चा समावेश आहे. आता 28 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर 'पंचायत 3' रिलीज झाली आहे. फुलेरा गाव आणि या गावातील गावकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. 30 गावे फिरल्यानंतर निर्मात्यांनी 'फुलेरा' गावाची निवड केली आहे. याप्रमाणे आणखी काही किस्से जाणून घेतल्यानंतर प्रेक्षक हैराण होतील.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले; म्हणाले,"ऐश्वर्या तुमची सून असूनही तुम्ही..."
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट (Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce) होणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. बच्चन कुटुंबात सध्या आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. बच्चन कुटुंबीय काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबाचा भाग असलेल्या ऐश्वर्या रायसोबत काहीही बोलताना दिसून येत नाहीत. एकंदरीतच बच्चन कुटुंबियांकडून ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gautami Patil : लावणी नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली, गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट : डॉ. गणेश चंदनशिवे
Dr. Ganesh Chandanshive on Gautami Patil : गौतमी पाटील (Gautami Patil) लावणी करत नाही तर ती आयटम साँग करते. लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे हे सिनेपत्रकार अमोल परचुरे यांच्या 'कॅच अप' या शोमध्ये म्हणाले. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी तमाशाप्रधान चित्रपटातील तमाशाचं चित्रण, तंबूतल्या अस्सल तमाशाची आजची स्थिती, लोकशाहीरांचं योगदान, लोककला अकादमीमधून सुरू असलेला लोककलेचा प्रचार, बॉलिवूडचा अनुभव अशा विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Salman Khan House Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणी शूटर्सना मदत करणारे तीन संशयित अटकेत, चंदिगड पोलिसांची कारवाई
Salman Khan : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चंदिगड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. हे तिन्ही संशयित आरोपी बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. या तिघांना हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.