Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Shoaib Malik Wedding : सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा; शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत थाटला संसार


Shoaib Malik Sana Javed Wedding : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) तिसरं लग्न केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत शोएबने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Fighter Advance Booking : हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'फायटर'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात


Fighter Advance Booking : 'जवान','पठाण','गदर 2','अॅनिमल' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'सह अनेक सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे. 2024 चीदेखील दमदार सुरुवात झाली आहे. आता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' करमुक्त करा; राहुल नार्वेकरांचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र


Main Atal Hoon : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा सिनेमा अखेर सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अशातच आता हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kangana Ranaut : रामाची मूर्ती पाहून कंगणा चांगलीच मोहित झाली; मूर्तीकाराचे केले तोंडभरुन कौतुक


Kangana Ranaut : अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामाच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी सर्वांना रामाच्या मूर्तीची पाहायला मिळाली आहे. मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut) हीने रामाच्या मूर्तीचे फोटो शेअर करत मूर्तीकारांचे कौतुक केले आहे. कंगणाने कल्पना केली होती तशीच तिला मोहित करणारी रामाची मूर्ती आहे. कंगणाने श्री रामाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत. कंगणाने मूर्तीचे फोटो शेअर करताना लिहिले की, "मला वाटत होतं रामाची मूर्ती मला तरुणाप्रमाणे वाटेल. मात्र, मी रामाची कल्पना करत होते, त्याच पद्धतीची मूर्ती साकारण्यात आली आहे".


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serials : जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग'चा टीआरपीच्या शर्यतीत काही केल्या पहिला क्रमांक हटेना; जाणून घ्या TRP Report


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा