Rashmika Mandanna: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)  ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रश्मिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच रश्मिकाचा  'द गर्लफ्रेंड'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील रश्मिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


रश्मिकाच्या लूकनं वेधलं लक्ष


रश्मिकानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड'  या चित्रपटामधील लूक दिसत आहे. व्हिडीओमध्ये रश्मिका ही पाण्याच्या आत दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती स्माईल करताना दिसत आहे तर व्हिडीओच्या शेवटी रश्मिकाच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव दिसत आहेत. रश्मिकानं 'द गर्लफ्रेंड'  या चित्रपटाचा खास व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "जग महान प्रेम कथांनी भरलेले आहे. पण अशा काही प्रेमकथा आहेत ज्या यापूर्वी कधीही ऐकल्या नाहीत किंवा पाहिल्या नाहीत आणि ‘द गर्लफ्रेंड’ ही अशीच एक आहे." 


पाहा व्हिडीओ:






'द गर्लफ्रेंड' : रश्मिकाचा 24 वा चित्रपट 


'द गर्लफ्रेंड'  हा रश्मिकाचा 24 वा चित्रपट आहे.‘चलो’, ‘किरिक पार्टी’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘पुष्पा: द राइज’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता रश्मिकाचा 24 वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहुल रवींद्रम यांनी केले आहे.


'द गर्लफ्रेंड'  या चित्रपटासोबतच रश्मिकाचा अॅनिमल हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 'अॅनिमल' या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.अॅनिमल चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी,  तेलुगु, तमिळ,  कन्नड आणि  मल्याळम या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


 इतर महत्वाच्या बातम्या:


Animal : 'अ‍ॅनिमल' सिनेमातील 'हुआ मैं' गाणं आऊट; रणबीर-रश्मिकाच्या सिझलिंग केमिस्ट्रीने वेधलं लक्ष