Tejasswi Prakash Injured : बॉलिवुडचं विश्व मोठं रंजक आहे. या क्षेत्रात रोज नवनवीन घडामोडी घडतात. अनेक दिग्गज कलाकार इथं नवनवे प्रयोग करत असतात. छोट्या पडद्यावरील कलाकृतींवर प्रेम करणाराही मोठा चाहतावर्ग आहे. सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील मोठे चेहरे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करतात. मात्र याच कार्यक्रमात भाग घेतलेला असताना अभिनेत्री तेजस्वी प्रकाश जखमी झाली आहे. खाद्यपदार्थ तयार करत असताना तिचा हात जळला आहे. 


सेलिब्रिटी मास्टरशेफ कार्यक्रमात दिसणार तेजस्वी प्रकाश  


तेजस्वी प्रकाशचा संपूर्ण महाराष्ट्र तसेच देसभरात मोठा चाहतावर्ग आहे. तिने टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्यावर लाखो लोक प्रेम करतात. याआधी तेजस्वी प्रकाश बिग बॉस या रियालिटी शो तसेच नागीण यासारख्या मालिकांत दिसलेली आहे. त्यानंतर आता ही अभिनेत्री सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात दिसणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण झालेले आहे. मात्र या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान तेजस्वीचा हात भाजला आहे.खुद्द तेजस्वीनेच याबाबत माहिती दिली आहे. 


नेमकं काय घडलं? 


शनिवारी तेजस्वी प्रकाश सेलिब्रिटी मास्टरशेफच्या सेटवर दिसली. यावेळी तिने ब्लू टॉप आणि ग्रे जॉगर परिधान केले होते. शूटिंग संपल्यानंतर तिने पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या. यावेळी बोलताना तिने तिचा हात जळाल्याचं सांगितलं. खाद्यपदार्थ तयार करताना ही जखम झाल्याचं तिने सांगितलं आहे. ओव्हनमुळे तिचा हात भाजल्याचं तिनं म्हटलं आहे. यावेळी तेजस्वीने हाताला क्रिम लावल्याचंही दाखवलं. तेजस्वी प्रकाशने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे. 






कार्यक्रमात दिसणार अनेक सेलिब्रिटी दिसणार 


सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात तेजस्वी प्रकाशसोबतच अर्जना गौतमही झळकणार आहे. या कार्यक्रमात दीपिका कक्कड़ इब्राहिम, गौरव खन्ना, राजीव अदातिया, निक्की तंबोळी, फेसल मलिक, उषा नाडकर्णी, कबिता सिंह असे दिग्गज सेलिब्रिटी दिसणार आहे.  


हेही वाचा :


बालपणी आई-वडिलांची साथ सुटली, त्यानंतर नशीबी अठराविश्व दारिद्र्य; फक्त एका निर्णयानं बनवलं राजेश खन्ना यांना बॉलिवूडचा 'पहिला सुपरस्टार'


Pushpa 2 BO Collection Day 24: पुष्पा-पुष्पा-पुष्पा राज... 24 व्या दिवशीही अल्लू अर्जुनच्या फिल्मचा धमाका; कमावले इतके कोटी...


Marathi Actress : तुम हुस्न परी...! बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंची चर्चा