Pushpa 2 BO Collection Day 24: सरत्या वर्षात साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन बॉक्स ऑफिसचा बादशहा बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या पुष्पा 2 या चित्रपटानं रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे आणि अजूनही त्याची कमाई थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. या चित्रपटानं सर्व भाषांमध्ये 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाही पुष्पा 2 वर काहीही परिणाम झालेला नाही. चित्रपट सर्वांना मागे पछाडत मजबूत गल्ला जमवत आहे. चला जाणून घेऊया चित्रपटानं 24 व्या दिवशी किती कमाई केली?
पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन
Sacnilk च्या अहवालानुसार, पुष्पा 2 नं चौथ्या शनिवारी सर्व भाषांमध्ये 12.50 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या 24 व्या दिवसाच्या कलेक्शनचे हे अधिकृत आकडे नाहीत. पण जर पुष्पा 2 नं 12.50 कोटी रुपये कमावले तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1141.35 कोटी रुपये होईल. या चित्रपटानं 23 व्या दिवशी 8.75 कोटींची कमाई केली होती.
पुष्पा 2 नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर, चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कमाई 129.5 कोटी रुपये आहे. जर आपण शनिवारच्या कलेक्शनबद्दल बोललो तर, पहिल्या शनिवारी 119.25 कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी 63.3 कोटी रुपये आणि तिसऱ्या शनिवारी 24.75 कोटी रुपये कमावले.
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सुकुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2021 मध्ये आलेल्या पुष्पा या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. पुष्पा 2 मध्ये पहिल्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यात आली आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात पुष्पा राजच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात राजकीय संबंधही दाखवण्यात आले आहेत. चाहत्यांना चित्रपटाची कथा आणि अल्लू अर्जुनचं स्टारडम खूप आवडलं. चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :