Salman Khan Praises Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या आगामी बॅड न्यूज (Bad Newz) चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॅड न्यूज चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्कंठा लागून आहे. विकी कौशल बॅड न्यूज चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात तृप्ति डिमरी आणि एमी विर्क मूख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं तौबा तौबा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं रिलीज झाल्यापासूनच ट्रेंडमध्ये आहे. अनेकांच्या ओठांवर हे गाणं रुळलं आहे.
भाईजानकडून कतरिनाच्या Hubby चं कौतुक
तौबा तौबा गाण्यात विकी कौशलचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तौबा तौबा गाण्यात विकी कौशल स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या गाण्यात त्याच्या डान्स परफॉर्मन्सने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. 'तौबा तौबा'वर विकीच्या डान्स मूव्ह्ज पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर रिझ करत आहेत. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेही या गाण्यासाठी विकीचे कौतुक केले आहे. आता तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानेदेखील विकी कौशलचं कौतुक केलं आहे.
सलमाननं विकी कौशलसाठी शेअर केली खास पोस्ट
सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत विकी कौशलचं कौतुक केलं आहे. सलमान खानने इंस्टाग्राम स्टोरीवर तौबा तौबा गाणं शेअर करून विकीचं कौतुक केलं आहे. सलमान खानचे कौतुक ऐकून विकी कौशललाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला असून त्याने लगेचच सलमान खानच्या पोस्टला उत्तर (Vicky Kaushal Reshare Salman Khan's Story) दिलं आहे. दोन्ही स्टारमधील या संवादाकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सलमान खानकडून विकी कौशलचं कौतुक
सलमानने इंस्टाग्राम स्टोरीवर 'तौबा तौबा' गाण्याचा व्हिडीओ शेअर करताना सलमान खानने लिहिलं - ग्रेट मूव्ह्स विकी, गाणं छान दिसत आहे. हार्दिक शुभेच्छा. सलमानकडून शुभेच्छा मिळाल्यानंतर विक्कीला खूप आनंद झाला. त्याने लगेचच सलमानच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. स्टोरीचा फोटो शेअर करत लिहिलं, तुम्ही खूप गोड आहात सलमान सर. खूप खूप धन्यवाद. ही माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :