Actor Mayilsamy Passed Away: तमिळ अभिनेते मायिलसामी (Mayilsamy) यांचे रविवार (19 फेब्रुवारी)  निधन झाले आहे. त्यांनी 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला (Ramesh Bala) यांनी सोशल मीडियावर मायिलसामी यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. तसेच प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी देखील ट्वीट शेअर करुन मायिलसामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.            


रमेश बाला यांचे ट्वीट


मायिलसामी यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'दिवंगत अभिनेता मायिलसामी यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांचे कुटुंबीय त्यांना पोरूर रामचंद्र रुग्णालयात घेऊन जात होते, तेव्हा वाटेतच त्यांचे निधन झाले. ते अनेक चित्रपटांमध्ये मेकिंगमध्ये व्यस्त होते. दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली.', असं रमेश बाला यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. 




कमल हसन यांचे ट्वीट


'माझा मित्र मायिलसामीनं, अभिनयाची स्वतःची शैली प्रेक्षकांसमोर सादर केली.  प्रिय मित्राला श्रद्धांजली.' असं ट्वीट कमल हसन यांनी शेअर केलं. 






मायिलसामी यांच्या 39 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या  कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांनी आगामी चित्रफट  ग्लासमेटचं डबिंग पूर्ण केलं होतं.  मायिलसामी हे स्टेज परफॉर्मर, कॉमेडियन, टीव्ही होस्ट आणि थिएटर आर्टिस्ट होते. ते तमिळ टेलिव्हिजन क्षेत्रातमध्ये त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. 






मायिलसामी यांचे चित्रपट 


ध्वनी कनवुगल,इं थंगाची पडिचावा, अपूर्व सगोधररगल या चित्रपटांमध्ये मायिलसामी यांनी काम केलं. तसेच  लोलूपा हा शो त्यांनी होस्ट केला.  मर्मदेसम या मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलं.  मायिलसामी यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nandamuri Taraka Ratna Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास