Do Baaraa Taapsee Pannu First Look : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या ‘दो बारा’ (Do Baaraa) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिच्या या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag kashyap) पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत दिसणार आहे.
नुकताच तापसी पन्नूचा ‘शाबास मिथू’ (Shabaash Mithu) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तपासीने महिला क्रिकेटपटू मिताली राजची (Mithali Raj) भूमिका साकारली होती. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले. मितालीची भूमिका साकारल्यानंतर तापसी आता या आगामी सायन्स फिक्शन चित्रपटात देखील एका हटके भूमिकेत दिसणार आहे.
नुकताच ‘दो बारा’ या चित्रपटातील तापसी पन्नूचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये तापसी एकदम बॉसी लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये ती थोडीशी घाबरलेली आणि त्रस्त देखील दिसत आहे. तिच्या मागे विजा चमकत आहेत. तिचा हा लूक पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
पाहा पोस्टर :
या चित्रपटाच्या माध्यमातून तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी दोघांनी 'मनमर्जियां', ‘थप्पड’ चित्रपटात एकत्र काम केले होते. 19 ऑगस्टला तापसीचा ‘दो बारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरूखच्या चित्रपटातही तापसीची वर्णी
अभिनेत्री तापसी पन्नूकडे आगामी अनेक चित्रपटांची रंग लागली आहे. तापसी शाहरूख खानबरोबर ‘डंकी’ या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. तापसी राजकुमार आणि शाहरुखसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.
संबंधित बातम्या