Taapsee Pannu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. सध्या तापसीच्या या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तापसीच्या या नव्या गाडीच्या फिचर्सबाबत आणि या गाडीच्या किंमतीबाबत जाणून घेऊयात...


तापसीच्या नव्या कारची किंमत


तपसी पन्नूच्या नव्या लक्झरी कारचं नाव Mercedes-Benz Maybach GLS 600 आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत जवळपास 2.92 कोटी रुपये  आहे.  मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार्स या इन्स्टाग्राम पेजवरुन तपसी पन्नूच्या नव्या कारचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये तापसी ही तिच्या नव्या कारसोबत पोज देताना दिसत आहे.


जाणून घ्या गाडीमधील फिचर्सबाबत...


तापसीच्या या नव्या लक्झरी कारमध्ये 4.0 लीटर V8 ट्विन टर्बो इंजिन आहे, जे 550 hp ची पॉवर आणि 730 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. जे 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. पॉवरफुल इंजिन असलेली ही लक्झरी कार ताशी 250 किलोमीटरचा वेग गाठण्यास सक्षम आहे. ही लक्झरी फोर व्हील ड्राइव्ह पॉवर ट्रेनसह येते.


फोर-वे क्लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक लिफ्टिंग साइड स्टेप्स, पॅनोरामिक सनरूफ, अडॅप्टिव्ह एअर सस्पेन्शन, बर्मेस्टर साउंड सिस्टम, 22-इंच अलॉय व्हील, ड्युअल 12.3-इंच डिजिटल डिस्प्ले इत्यादी  फिचर्स तापसीच्या या नव्या कारमध्ये आहेत.


तापसीचे आगामी चित्रपट


तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. पिंक या चित्रपटामधील तापसीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. तापसी ही शाहरुखच्या डंकी या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.


तापसीच्या  'फिर आयी हसीन दिलरुबा' या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.  काही महिन्यांपूर्वी तापसीनं या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते.  या पोस्टरला तापसीनं कॅप्शन दिलं,  'एक नए शहर में फिर एक बार...तहलका मचाने आ रही है, हमारी हसीन दिलरुबा.'






इतर महत्वाच्या बातम्या:


Taapsee Pannu : संसार कधी थाटणार? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत तापसी पन्नू म्हणाली,"मी अजून प्रेग्नेंट नाही"