Kangana Ranaut :बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वादांचे तसे जुने नाते आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. यावेळेस कंगनाने चक्क ‘फिल्मफेअर’शी (Filmfare) पंगा घेतला आहे. कंगनाने फिल्म मॅगझिनवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सतत नकार देऊनही कंगनाला पुरस्कारासाठी नामांकित केल्यामुळे तिने या मासिकाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे.


बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘फिल्मफेअर’ या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागामध्ये कंगना रनौत हिला नामांकन देण्यात आले आहे. कंगनाला हे नामांकन तिच्या 'थलायवी' या चित्रपटासाठी मिळाले आहे. मात्र, कंगनाने आता या मॅगझिनवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.


नेमकं कारण काय?


कंगना रनौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मासिकाविरोधात खटला दाखल करण्याचे कारणही दिले आहे. कंगनाने असा दावा केला आहे की, नाही म्हटल्यानंतरही फिल्मफेअर या नामांकित चित्रपट मासिकाने त्यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कंगनाला आमंत्रित केले आहे. इतकेच नाही तर, त्याच्या 'थलायवी' या चित्रपटालाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मात्र, यामुळे कंगना खूपच नाराज आहे.


पाहा पोस्ट :




67व्या फिल्मफेअर पुरस्कार 2022साठीची नामांकन यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये, रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीमध्ये '83' चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे, तर कंगनाला 'थलायवी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले आहे. कंगना रनौतला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी, क्रिती सेनन, परिणीती चोप्रा, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्यासह सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मात्र, कंगनाला हे नॉमिनेशन आवडलेले नाही.


‘फिल्मफेअर’वर कंगनाने घातला बहिष्कार!


इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाने लिहिले की, तिने 2014पासून फिल्मफेअरवर बहिष्कार घातला आहे. तिने या मॅगझिनवर अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे. तसे ती याचा भाग होणार नसल्याचेही तिने सांगितले आहे. कंगनाने म्हटले की, तिला यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक कॉल येत आहेत, कारण त्यांना 'थलायवी'साठी कंगनाला फिल्म्फ्रार पुरस्कार द्यायचा आहे.


‘फिल्मफेअर’ने नामांकन घेतले मागे!


कंगनाच्या या आरोपांनंतर ‘फिल्मफेअर’ने तिचे नामांकन मागे घेतले आहे. तसे, फिल्मफेअरने स्पष्टीकरण देखील दिले आहे. कंगना रनौतने केलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचेही मासिकाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंगनाला या समारंभासाठी आमंत्रित करून सर्व चित्रपट कलाकारांसोबत भारतीय सिनेमा साजरा करायचा होता, असे त्यांनी म्हटले आहे. फिल्मफेअरने आपल्या निवेदनात हे देखील स्पष्ट केले आहे की, ते नॉमिनेट व्यक्तीलाच हा पुरस्कार देतात, मग ती या कार्यक्रमात उपस्थित नसो किंवा तिने कोणताही परफॉर्मन्स दिलेला नसो. कंगनाने यापूर्वी 5 फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले आहेत, त्यापैकी 2 अवॉर्ड फंक्शन्समध्ये ती उपस्थित देखील नव्हती.


हेही वाचा :


Kangana Ranaut : कंगना रनौतला झाला डेंग्यू; आराम करायचा सोडून 'इमरजंसी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त


Kangana Ranaut : ‘हीच खरी महिला शक्ती’, कंगना रनौतने दिल्या द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा!