Sacheen Littlefeather : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने म्हणजेच ऑस्करनं नुकतीच पन्नास वर्षांपूर्वीच्या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे. ऑस्करनं 45 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये अभिनेत्री सचिन लिटिलफेदर ( Sacheen Littlefeather) यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अमेरिकन कार्यकर्त्या आणि अभिनेत्री सचिन लिटिलफेदर  यांची माफी ऑस्करनं मागितली. सचिन लिटिलफेदर या आता 75 वर्षांच्या आहेत. जेव्हा सचिन लिटलफेदर यांनी मार्लन ब्रँडो यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नाकारण्यासाठी आणि 1973 मध्ये अमेरिकेने स्थानिक लोकांसोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल बोलण्यासाठी स्टेजवर पाऊल ठेवले तेव्हा त्या 26 वर्षांच्या होत्या. हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील चर्चेत असणारा प्रसंग होता. 


1973 मध्ये मार्लन ब्रँडोच्या वतीने अकादमी अवॉर्ड्स स्वीकारण्यासाठी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर सचिन लिटिलफेदर या आल्या होत्या. मंचावरील त्यांच्या 60 सेकंदांच्या भावूक भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले. या भाषणामध्ये सचिन लिटिलफेदर यांनी सांगितलं की, 'आज चित्रपटसृष्टीने अमेरिकन भारतीयांना दिलेली वागणूक ही योग्य नाही' अमेरिकन भारतीयांना चांगली वागणूक न दिल्यानं सचिन लिटिलफेदर  यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर बहिष्कृत करण्यात आले. गेल्या 50 वर्षांपासून त्याच्याशी भेदभाव करण्यात आला.


27 मार्च 1973 रोजी "द गॉडफादर" मधील भूमिकेसाठी मार्लन ब्रँडो यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी  सचिन लिटिलफेदर या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर आल्या होत्या. पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर काहींनी त्यांचे कौतुक केलं तर काहींनी त्यांचा विरोध केला होता. 


पाहा व्हिडीओ:



अकादमीचे माजी अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी लिटलफेदरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "तुमच्यासोबत झालेले गैरवर्तन हे अनावश्यक आणि अन्यायकारक आहे.  इतके दिवस तुम्ही दाखवलेले धाडस ओळखता आले नाही. यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचे कौतुक करतो."


ऑस्करनं माफी मागितल्यानंतर सचिन लिटिलफेदर यांची प्रतिक्रिया 
सचिन लिटिलफेदर एका निवेदनात म्हटले आहे की,"आम्ही भारतीय खूप सहनशील लोक आहोत - फक्त 50 वर्षे झाली आहेत! पन्नास वर्षांनंतर झालेला बदल पाहून मला आनंद वाटतो "  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Kangana Ranaut : ‘नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा....’, ‘या’ कारणामुळे ‘फिल्मफेअर’ विरोधात कंगना कोर्टाचा दरवाजा ठोठावणार!