Swatantrya Veer Savarkar Trailer Out : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) अभिनीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. नुकताच या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. "देश हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे" असे डायलॉग टीझरमध्ये आहेत. 


'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा ट्रेलर आऊट! (Swatantrya Veer Savarkar Trailer Out)
 
भारतीय स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदार सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या आयुष्यावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील सावरकरांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद या सिनेमात स्पष्टपणे दाखवण्यात येणार आहेत. तसेच जन्मठेपेची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतरही सावरकरांच्या कुटुंबावर झालेला अन्याय, त्यांना मिळालेली दुय्यम वागणूक अनेक अनेक गोष्टींवर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे.


चित्रपटात दमदार संवाद आपल्याला ऐकायला मिळणार आहेत याची झलकही ट्रेलरमध्ये दिसली आहे.  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात सावकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा असून त्यांच्या पत्नीची भूमिका अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) साकारली आहे. दमदार स्टारकास्ट, चांगला विषय आणि उत्तम कथानक असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.


'स्वातंत्र्यवीर सावरकर' प्रोपगंडा चित्रपट? 


आजतकला दिलेल्या मुलाखतीत रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' प्रोपगंडा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चांगलं काम करत आहेत. मी त्यांचा मोठा चाहता आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा प्रोपगंडा नव्हे तर अँटी प्रोपगंडा सिनेमा आहे. देशातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्यसैनिकाची गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी या सिनेमावर काम करत आहे".  


'स्वातंत्र्यवीर सावरकर' कधी रिलीज होणार? (Swatantrya Veer Savarkar Release Date)


'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीप हुड्डा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यानेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आधी महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण नंतर काही कारणाने त्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं नाही.



संबंधित बातम्या


Swatantrya Veer Savarkar Release Date: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; रणदीप हुड्डानं शेअर केला खास व्हिडीओ